जनतेज न्युज

अकोले तालुक्यात अदिवासी समाजाच्या व्यक्तींना ख्रिती धर्मांत धर्मांतरित करण्याचा डाव गावकऱ्यांनी उधळला.

प्रतिनिधी , अहमदनगर : क्रिसमस दिनाचे औचित्य साधून अकोले तालुक्यात सियोन प्रार्थना केंद्र म्हणजे चर्चचे भूमिपूजन आयोजित करून त्यात आदिवासी बांधवांच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रकाराची माहीती आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांना लागताच त्यांनी आदिवासी भागातील आपल्या कार्यकर्त्यांसह तिरढे येथे जाऊन हर हर महादेव,जय आदिवासी म्हणत हा कार्यक्रम उधळून लावला आहे.
यावेळी भूमिपूजन करणाऱ्या व्यक्तीची पळता भुई थोडी झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र, त्यांनी तेथुन पळ काढला.काही जण अकोले तालुक्यातील तिरढे, पाडोशी,एकदरे,देवगाव,भंडारदरा या परिसरातील आदिवासी बांधवांना आपल्या धर्माकडे आकर्षित करत असल्याच्या चर्चा या परिसरात रंगत होती.याच अनुषंगाने क्रिसमसचे औचित्य साधून तिरढे येथे चर्चचे भूमिपूजन करण्याचे नियोजन झाले. त्याकरता आजूबाजूच्या गावात प्रचार करून साधकांना बोलवण्यात आले होेते. ही बाब आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव व कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देऊन हा कार्यक्रम उधळून लावला आहे.