प्रतिनिधी , लातूर : सलग २४ तास अविरत लावणी वरती डान्स करत सृष्टी सुधीर जगताप या 9 वी च्या मुलीने आतापर्यंत कोणीही न केलेलं आशिया बुक ऑफ रेकॉर्ड केले आहे. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 ला सुरू केलेला लावणी डान्स 27 जानेवारी रोजी 4.30 ला संपवला. आशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या जज यांनी रेकॉर्ड झाले, अशी घोषणा करत सृष्टीला प्रमाणपत्र, मानचिन्ह देऊन गौरवित केले.यावेळी मोठ्या संख्येने लातूरकर उपस्थित होते.
