जनतेज न्युज

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू तर 25 जनावरे ही पडली मृत्युमुखी

प्रतिनिधी , बुलडाणा : यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून बुलडाणा जिल्ह्यात 30.33 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर 10 जुलै पर्यंत अंगावर वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जनावरेही अपघाती मृत्युमुखी पडल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात घेण्यात आली आहे. परंतु गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सततचा पाऊस सुरू आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, काही ठिकाणी शेतात पानी साचले असून पिकांना धोका निर्माण झालाय, तर यावर्षी आपत्ती विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 4 जणांचा अंगावर विज पडून मृत्यू झालाय एक महिला पुरात वाहुन गेल्याने तिचा मृत्यू झालाय. यासोबतच 25 जनावरे देखील मृत्युमखी पडले आहेत. सततच्या पावसाने जिल्ह्यातील 12 घरांची पूर्णतः तर 39 घरांची अंशतः पडझड झालीय. शेगाव , संग्रामपूर, सिंदखेड राजा तालुक्यात आतापर्यंत 100 हेक्टर च्या वर जमीन खरडून गेली असून सिंदखेड राजा तालुक्यात 7 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकांचे, पाऊस आणि हवेमुळे पडून नुकसान झालय. शिवाय शेतात पानी साचल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीची शक्यता आहे.