जनतेज न्युज

वाहतूक पोलीस हवालदाराला चारचाकीने नेले फरफटत…

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : डोंबिवली धक्कादायक घटना समोर आली आहे.डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे हे आपले कर्तव्य बजावत असतानाच काळी काच आणि मोठ्याने डेक लावलेल्या एका गाडी चालकाला थांबवायचा प्रयत्न केला असता त्या गाडीचालकाने त्यांना फरफटत नेले. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून वाहतूक पोलिसांच्या तक्रारीनंतर रामनगर पोलीसानी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे

डोंबिवली स्टेशन जवळील एस.के.पाटील चौक येथे वाहतूक पोलीस हवालदार बाळासाहेब होरे  हे आपले कर्तव्य बजावत असतानाच यांना एका चारचाकी गाडीने धडक देत फरफटत नेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी 6.30च्या सुमारास घडली आहे. गाडीला काळ्या काचा आणि मोठ्याने डेक लावला असल्याने हवालदार होरे यांनी गाडी चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा दिला असता त्याने गाडी न थांबवता होरे यांच्या अंगावर घातली. होरे यांनी गाडीचे बोनेट पकडले असता चालकाने त्यांना फरफटवत गाडी चिपळूणकर रोड मार्गे बालभवन पर्यंत नेली. तेथे होरे यांना गाडीवरून खाली पाडत चालकाने पुन्हा मागे गाडी वळवून तेथून पळ काढला.दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.यादरम्यान कारचालकाने एका रिक्षाचालकास देखील धडक दिली असून रिक्षाचालक देखील जखमी झाला आहे. यात होरे यांच्या हाताला, पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडी चालकावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.