जनतेज न्युज

बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाच्या अधिकार मिळाला पण शेतकऱ्यांच्या पदरात पडण्या सारखं काही दिसत नाही

प्रतिनिधी , जळगाव : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिला आहे. या निर्णयावर शेतकरी नेते एस बी पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले बाजार समिती शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून सोसायटी व ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या माध्यमातून मतदान व्हायचं या सरकारने शेतकऱ्यांना डायरेक्ट मतदानाचा अधिकार दिला आहे. तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या 75 टक्के आहे म्हणजे 75 टक्के जनता मतदानात सहभागी होणार आहे. मिनी आमदार म्हणावं अशा प्रकारची ती निवडणूक होणार आहे. ती प्रक्रिया करताना काय काय प्रॅक्टिकली अडचण येतात.येणारा काळच सांगेल. परंतु त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यासारखं काही आहे असं सरळ काही दिसत नाही. कारण शेतकऱ्यांना बाजार समितीत गेल्यानंतर हवा असतो. तो भाव मतदार झाल्यानंतर लगेच तिथला कायदा बदलेल व चित्र बदलेल असं काही नाही. परंतु हरकत नाही नवीन प्रयोग म्हणून त्याचा स्वागत करूया असे शेतकरी नेते एस बी पाटील यांनी सांगितले.