प्रतिनिधी , उस्मानाबाद : केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनेने भारत बंदची हाक दिली होती. याच्या समर्थनार्थ तसेच पेट्रोल, डिसेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ कॉग्रेस पक्षाच्या वतीने आज उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , जिल्हाध्यक्ष अॅड धिरज पाटील , जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखान , शहराध्यक्ष अग्नीवेश शिंदे व पदाधिकारी मोठ्या संखेने उपास्थित होते . यावेळी अंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वहान्यात आली.
यावेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत माजी गृहराज्यमंत्री तसेच कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे यांना विचारले असता, हा प्रकार म्हणजे अधिकारी व शासन यांच्यात असलेल्या अच्यार संहितेचे उल्लंघण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आयपीएस असुनही त्यांनी प्रथम हायकोर्टात दाद मागावी का सुप्रीम कोर्टात हे देखील त्यांना समजले नाही. राज्यातील भक्कम महाविकास आघाडीचे सरकार जनहिताचे निर्णय घेत असुन सरकार अस्थिर करण्यात अपयश येत असलेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने प्रशासनातील अधिकारी व राज्यपाल यांच्या माध्यमातुन राष्ट्रपती राजवट लागु करण्याचा कुटील डाव असल्याची जहरी टीका त्यांनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.
