जनतेज न्युज

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापाऱ्यांचा आंदोलन तर खरेदी बंद असल्याने शेतकरी संतप्त

प्रतिनिधी, अमरावती : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी एक लाख पन्नास हजाराची एका व्यापाराच्या दुकानातून चोरी झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ढिसाळ सेक्युरिटी व डीसाळ कारभारामुळे ही चोरी झाल्याचा आरोप करत अडते व व्यापारांनी खरेदी बंद करून बाजार समितीच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. मात्र अस असताना दिवाळीनंतर आज सोमवार असल्यामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल शेतमाल विक्रीसाठी आणला, मात्र व्यापारी आणि अडते यांचे आंदोलन सुरू असल्यामुळें व्यापाऱ्याची खरेदी बंद असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांचा वाद बाजूला ठेवून शेतमालाची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तर व्यापारांचा शेतमाल जो चोरी झाला त्याची नुकसान भरपाई बाजार समितीने भरून द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.मात्र असं असताना बाजार समितीमध्ये मोठ्या तणाव पाहायला मिळाला यावेळी संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते, सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस असला तरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही त्यामुळे आता या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.