जनतेज न्युज

अमरावती जिल्ह्यात कोरोना वाढीचा दर 56 टक्क्यावर

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोणा रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेल आहे 1 फेब्रुवारी रोजी हे प्रमाण 22 टक्के होतं तर काल ज्या 419 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 235 रुग्न कोरोना पॉझिटिव आढळले हे प्रमाण 56 टक्के वर गेलेला आहे शहरातील नागरिक कोरोना नियमाचे कुठेही पालन करताना दिसत नाही त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पूर्ण वाढत आहे असा आरोप भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यानी केला
या पार्श्वूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले
जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून जिल्ह्यातील कोरोणाच्या संसर्गात वाढ झालेली आहे.राज्यात कोरोणा संक्रमणाचा दर घटत असताना अमरावतीत मात्र हा दर वाढत असल्याने नुकतीच केंद्राच्या आरोग्य पथकाने रविवारी जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून काही टिप्स दिल्या.
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत एकूण- 196320
एकूण रुग्णालयात पॉझिटिव दाखल -608
इथपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह रुग्ण- 23293
एकूण मृत्यू- 424
आतापर्यंत डिस्चार्ज केलेले रुग्ण- 22262
अमरावती जिल्ह्यात
1 फेब्रुवारी 405 नमुण्यापैकी 92 पॉझिटिव्ह 22.71 टक्के टक्केवारी..
8 फेब्रुवारी रोजी 417 नमुन्यांची तपासणी त्यापैकी 235 पॉझिटिव्ह -56.35%
अमरावती जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.57 टक्के आहे.