प्रतिनिधी , अमरावती : राज्यात बऱ्याच ठिकाणी अपंग व्यक्ती मतदानापासून मुकतात असे चित्र आहे. परंतु अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात या उलटच पहायला मिळाले. चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील विठोबा कीसन मेश्राम या अपंग वृध्द व्यक्ती सकाळीच मकदान केंद्रावर पोहचला होता. व यानंतर मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या व्हीलचेअरच्या माध्यमातून मतदान कक्षात जाऊन ८.१५ वाजता मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे अपंग व्यक्तींमध्ये सुध्दा मतदानाचा उत्साह दिसला.
