प्रतिनिधी : अमरावती – अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सत्तरगावा मध्ये पाणीपुरवठा प्रश्न मोठ्या प्रमानात भेड़सावत आहे, जिल्हातील ड्रायझोन वर शासनाने अजुन पर्यंत कोणताच निर्णय न घेतल्याने या गावांना गेल्या कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी आज या गावातील नागरिकांनी भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पिण्याच्या पाण्या वर त्वरीत निर्णय न घेतल्यास सत्तरगाव वाशी व ड्रायझोन मधील शेतकरी प्रश्नासाठी संपुर्ण जिल्हाभर चक्का जाम आंदोलन छेडु असा इशारा यावेळी नागरिकांनि दिला. फडणवीस सरकार च्या काळात या ड्राय झोन व सत्तर गावातील लोकांच्या पिण्याच्या प्रश्नासाठी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र ते अजूनही या सरकारने दिले नाही त्यामुळे हा प्रश्न अधिक मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे अशी टीका राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली.
