जनतेज न्युज

अमित ठाकरे यांनी घरी जाऊन घेतले दि.बा.पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन

प्रतिनिधी, नवी मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे हे आज महासंपर्क अभियानासाठी पनवेल मध्ये आले असता त्यांनी दि.बा.पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले,तर घरात बसून दि.बा.पाटील यांच्या कुटुंबीया सोबत चर्चाही केली.आपण दी.बा.पाटील साहेब यांना ओळखत असून,त्यांचे कार्य खूप मोठे होते,तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला.यावेळी त्यांनी राज साहेब या निर्णयाने खुश असल्याचे आवर्जून सांगितले.यावेळी दि.बा.पाटील यांच्या कुटंबियानी दी.बा.पाटील यांच्या फोटोचे सन्मान चिन्ह अमित ठाकरे यांना भेट दिले.