प्रतिनिधी , मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना शनिवारी रात्री उशिरा नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले. त्यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने कुटुंबीयांची तातडीने तपासणी करण्यात आली.
त्यात चिरंजीव अभिषेक बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अभिषेक बच्चन यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आज माझे वडील व मी दोघांचीही कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आढळली.
ही बातमी पण वाचा : महानायक अमिताभ बच्चन कोरोनाच्या कवेत
लक्षणे कमी असणार्या आमच्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही सर्व आवश्यक ती माहिती यंत्रणेला दिली आहे. आमचे कुटुंब आणि कर्मचारी या सर्वांची चाचणी घेतली जात आहे. घाबरू नका.
