जनतेज न्युज

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला…

निधी संकलन कार्याची माहिती सर्वदूर व्हावी या उद्देश्याने काढली रांगोळी…

डोंबिवली भाजप आणि संस्कार भारती तर्फे भागशाळा मैदानात काढण्यात आली भव्य रांगोळी….

प्रतिनिधि , डोंबिवली : अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक हिंदुनी या कार्यात योगदान द्यावे या उद्देशाने निधी संकलनाचे काम भारतभर सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून डोंबिवली भाजप तर्फे भागशाळा मैदान येथे संस्कार भारतीच्या रांगोळी कलाकारांच्या सहकार्याने भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. निधी संकलन कार्याची माहिती सर्वदूर व्हावी या उद्देश्याने रांगोळी काढण्यात आली.संस्कार भारतीचे रांगोळी कलाकार उमेश पांचाळ आणि इतर सहकारी यांनी ही भव्य रांगोळी आठ तासांच्या प्रयत्नांनी रेखाटली आहे. श्री राममंदिर जनजगृती हा या संकल्पनेचा उद्देश असल्याचे सांगितले. रांगोळी साकारण्यासाठी संस्कार भारतीच्या दहा रांगोळी कलाकारांनी मेहनत घेतली आहे. रांगोळीसाठी तीस किलो सफेद रांगोळी आणि वीस किलो रंगाचा वापर करण्यात आला आहे. पंचवीस बाय पंचवीस फुट चौरस रांगोळी काढण्यात आली असे उमेश पांचाळ यांनी सांगितले.