जनतेज न्युज

अर्जुना घाटाच्या दरीत कार कोसळल्याने अपघात ; चार ते पाच जण गंभीर जखमी

प्रतिनिधी, यवतमाळ : आर्णी रोडवरील अर्जुना घाटात भरधाव वेगातील कार कोसळली. या अपघातात कार मध्ये प्रवास करणारे चार ते पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. एम एच 29 ए आर 1967 असा कारचा क्रमांक आहे. अर्जुना घाट हा अपघात प्रवण मानला जातो.