प्रतिनिधी , सिंधूदुर्ग : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका होत असतानाच भाजपा खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यानी ही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वनमंत्री राठोड़ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. हे सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे. सत्ताधारी पक्ष आपली माणसं सांभण्याचं काम करत आहेत. आधी एकानं केलं, आता शिवसेना करत आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतलं जात होतं. ते पंधरा दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. मंदिरात जायला ते संत आहेत का? असा खोचक सवाल विचारतानाच आरोपांना उत्तरं द्या पळताय कशाला, अशा शब्दात राणे यांनी राठोडांना आव्हान दिलं आहे. सरकार विनयभंग, बलात्कार, हत्या प्रकरणातील लोकांना पाठीशी घालत आहे. सुशांतसिंग, दिशा सालियान, पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपींनाही पाठीशी घालत आहेत. या सरकारला तसं लायसन्स दिलं आहे का? असा सवाल करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.
