जनतेज न्युज

अल्प पर्जन्यमानातही लागवडीने व्यापले दीर्घ शिवार ; कृषी विभागाच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा खो

प्रतिनिधी, वर्धा : मान्सून सुरु होऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले नाही. तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पावसाचाही पत्ता नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबारी पेरणीचे संकट ओढविण्याची दाट शक्यता आहे.या वर्षी पावसाने चांगलाच विलंब केल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करण्यात आले आहे. सरासरी १०० मि.मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय लागवड करु नका, असे सांगण्यात येत आहे. तरीही शेतकऱ्यांनी या आवाहनाला खो देत लागवड केल्याने कृषी विभागही वैतागला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांनी आता पीक वाचविण्यासाठी स्प्रिकल च्या सहाय्याने पीक वाचविण्याचा प्रयत्न करावा.