जनतेज न्युज

गोव्यात राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी दिन साजरा केला

प्रतिनिधी, गोवा : महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक,प्रगतिशील शेतकरी,माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आज राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा दिवस गोव्यात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार हे देखील उपस्थित होते. कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला वंदन करून शिंदे आणि सर्व आमदार महोदयांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आशीर्वादाने राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरभराटीसाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही यासमयी बोलताना शिंदे यांनी दिली.