जनतेज न्युज

जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे कृषि दिनाचे आयोजन

प्रतिनिधी, नांदेड : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा त्यांचा वाढदिवस कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे कृषि दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतुन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कृषि विषयक जनजागृती करण्यासाठी जिल्हयातील सर्व शाळामध्ये 1 जुलै रोजी कृषि विषयक माहिती वाचुन दाखविण्यात येणार आहे.1 जुलै 2022 रोजी जिल्हा व तालुकास्तरावर कृषिदिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यादिवशी जिल्हा परिषदेत शेंद्रीय गहु, गुळ, हळद, दाळी तसेच गांडुळखत विक्री, सेंद्रीय भाजीपाला विक्रीसाठी बळवंत पौळ बनचिंचोली हदगांव, भगवानराव इंगोले (कृषि भुषण सेंद्रीय शेती) यांचा स्टॉल असणार आहे. कृषि विषयक ज्ञान मिळण्यासाठी ॲग्रोवन मार्फत कृषि विषयक विविध पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.