प्रतिनिधी , कोलापूर : पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील 20 वर्षाच्या विवाहीत महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी एक अल्पवयीन मुलासह दोघांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश उर्फ पुष्पक आदाम ढगे (वय 19) आणि एका 16 वर्षांच्या अल्पवयीन अशा दोघांनी मिळून हे कृत्य केले आहे. हे दोघेही कोडोली येथील साखरवाडी परिसरात राहतात. स्वतः पीडित महिलेने कोडोली पोलिसात याबाबत फिर्याद दिली असून दोन्ही संशयित आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
