प्रतिनिधी , यवतमाळ : वणी येथील नांदेपेरा मार्गावरील वांजरी शेत शिवारात एका विवाहित महिलेला दगडाने ठेचून निर्घुण हत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
महिलेचे नाव जया मनोज आवारी (32) असे असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मृतक महिला ही वणी तालुक्यातील पिंपळगाव येथील असून काही वर्षापूर्वी तिच्यावर येथील एका तरुणाशी लग्न झाले होते त्यानंतर ती तिच्या पतीसोबत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे राहत होती. मात्र मागील सहा वर्षापासून ती पतीपासून विभक्त झाली होती. नांदेपेरा रोडवर महिलेचा मृतदेह आढळून आला.
महिलेवर दगडाने मागून हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला. पुढील तपास वणी पोलीस स्टेशन ठाण्याचे ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
