जनतेज न्युज

उस्मानाबाद भाजयुमोच्या वतीने श्रीमती ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात आंदोलन.

प्रतिनिधी , उस्मानाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यावर प.बंगाल दौऱ्यावर असताना झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद इथं निदर्शने करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे हे निदर्शने करण्यात आली. यावेळी प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्‍यक्ष श्री.जे.पी. नड्डा साहेब यांच्यावर दि. 10/12/2020 रोजी प. बंगालमध्ये जिवघेना हल्ला झाला. हा हल्ला तृणमुल कॉग्रेसच्या कार्यकर्त्यानी केला. प. बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी ह्या अत्यंत सुडबुध्दीने राजकारण करत असून प. बंगाल च्या थोर विचाराना पायमल्ली तुडवून अत्यंत बेफीक्रीपणाने वागत आहेत. मागील कांही दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते प. बंगालमध्ये प्रचारासाठी गेले की ममता बॅनर्जी सरकार हे लोकशाही पायदळी तुडवून झुंडशाही, दादागीरी, करुन वातावरण दुषीत करत आहेत. असे मत भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.