प्रतिनिधी, ठाणे : महाराष्ट्रात झालेल्या सत्तातंरानंतर भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या युतीचे सर्व-सामान्य जनतेचे सरकार आले. तेव्हापासून विरोधी पक्षातील म्हणजेच महाविकास आघाडीतील सदस्य भारतीय जनता पक्षाच्या सन्माननिय नेत्यांवर टिका-टिपणी करत जाहिर सभेत आणि वृत्तवाहिनींवर बेताल वक्तव्य करीत आहेत. आधीच्या ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांची पदे गेल्यामुळे अनेक माजी मंत्री राजकारणाची पातळी सोडून तोंडात येईल ते असंस्कृतपणे बरळत आहेत.अशाच असंस्कृतपणाचा प्रत्यय कुडाळ येथे झालेल्या “विराट मोर्चा” नामक महाविकास आघाडीच्या सार्वजनिक सभेत दिसुन आला. माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव यांनी भारत सरकार मधील केंद्रियमंत्री नारायण राणे यांच्यावत अतिशय खालच्या दर्जाची, राजकीय पातळी सोडून, महाराष्ट्राच्या संस्कृतीची पायमल्ली करणारी, अश्लाघ्य आणि अवार्च्य भाषेत टिका करुन भारत सरकारमधील मंत्री महोदयांचा अपमान केला आहे. हे कृत्य कोणत्याही लोकप्रतिनिधीला अशोभनिय असुन लोकशाही विघातक आहे. म्हणूनच आम्ही आपल्याला या निवेदन पत्राद्वारे विनंती करत आहोत की, सदर आमदार भास्कर जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी.यासाठी भाजपा ठाणे शहर -जिल्हा उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी ठाण्यातील वागळे स्टेट पोलिस स्थानकात निवेदन दिले.यावेळी सहकार विभाग ठाणे अध्यक्ष अल्केश कदम, ठाणे शहर उपाध्यक्ष भा.ज .अनिल म्हात्रे, कार्यकारणी सदस्य ठाणे, श्री.रजनीश त्रिपाठी शहर जिल्हा भा.ज.पा युवा मोर्चा उपाध्यक्ष ठाणे सुनिल चव्हाण,श्री.विकी चेको, श्री.रितेश पावसकर,उमान शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते
