जनतेज न्युज

आई-वडिलांना संभाळा अन्यथा तीस टक्के पगार कपात करण्यात येईल…… मेघाराणी अंबुलगेकर

प्रतिनिधी , नांदेड : दि23.आज जिल्हा परिषद स्थायी समिती ची मीटिंग घेण्यात आली या मिटिंग मध्ये विविध प्रश्नांवर ती चर्चा करण्यात आली आहे मुख्य म्हणजे जे कर्मचारी आपल्या आई-वडिलांना सोबत घेऊन राहत नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या वेतन ना मधून तीस टक्के रक्कम कमी करण्यात येईल व ती रक्कम आई-वडिलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल असं या मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आली आहे दुसरं म्हणजे कोरोणा चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून जिल्हा येणाऱ्या व्यक्तींचा परिषद मार्फत टेस्ट कॅम्प राबवण्यात येणार आहे त्यानंतरच जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिली