जनतेज न्युज

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी म्हणून भारतीय जनता पार्टीने सुरुवात केले चौपाल.

प्रतिनिधी , मुंबई : चौपाल कार्यक्रमांतर्गत उत्तर भारतीय मोर्चा जवळपास 1000 चौपाल कार्यक्रम संपूर्ण मुंबईमध्ये आयोजित करणार.

मुंबईमध्ये येऊ घातलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आता आपली तयारी सुरू केली असून त्याने चौपाल या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही तयारी सर्वांसमोर आली असून आज मालाड येथील दिंडोशी विधानसभेतून उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने कार्यक्रमाला सुरुवात केली या कार्यक्रमा साठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे उद्घाटन केले. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे मोठे व प्रसिद्ध उत्तर भारतीय नेता या कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन आयोजक राज हंस सिंग यांनी नेतृत्व केले होते. तसेच चौपाल कार्यक्रम घराघरात जाऊन आपण स्थानिकांचे प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी या कार्यक्रमाच्या वतीने सांगितले तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा उत्तर भारतीय नागरिकांचे प्रश्‍न या चौपाल कार्यक्रमातून मांडण्याचे सांगितले.
पुढच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या हिमतीवर 150 सीट जिंकून आलेले असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.