जनतेज न्युज

आधी पीक कर्जाचे व्याज भरा , नंतर शासन देणार थेट भरपाई; शेतकऱ्यांच्या अडचणीत होणार वाढ

प्रतिनिधी , यवतमाळ : पीक कर्जावरील व्याजाच्या योजनेत शासनाने महत्वपूर्ण बदल केला आहे . आता कर्जासह व्याजाची वसुली बँका शेतकऱ्यांकडून करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून यथावकाश या व्याजाची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
शासनाने ही पद्धत डीबीटी स्कीमच्या अंतर्गत घेतली आहे . व्याज माफीचा हा नवा पॅटर्न शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरणार आहे. बँका पहिले शेतकऱ्यांकडून व्याज वसुली करेल. त्यानंतर बँका याची यादी शासनाला सादर करेल. त्यानंतर शासन यथावकाश या व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल. व्याज माफीचा हा नवा पॅटर्न शेतऱ्यांसाठी आणि बँकांसाठीही अडचणीचा ठरणार आहे. शेतकऱ्यां ना व्याजाची ही रक्कम शासनाकडून मिळण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. आणि बँकांच्या दृष्टीने विचार केला तर जिथे मूळ पीक कर्ज वसूल होत नाही. तिथे व्याजाची रक्कम वसूल कशी करायची हा प्रश्न बँकांना पडला आहे. पर्यायाने बँकेची थकबाकी दिसेल. शेतकरी थकबाकीदार दिसेल ,त्यामुळे नव्या पीक कर्जाला तो पात्र होणार नाही .ही नवी पद्धत शेतकऱ्यांसाठी आणि बँकांसाठी गुंतागुंतीची आहे . या नव्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होईल,असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.

1 ) पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याजासह परतफेड करावयाची आहे. ३१ मार्च पर्यंत पैसे न भरल्यास शेतकरी थकबाकीदार बनतील आणि त्यांना नवीन पीककर्ज घेताना अडचणी येतील. व्याजाची रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे.

2 ) शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. पीक कर्जाबाबत घेतलेला निर्णय आत्मघातकी ठरणारा आहे. शेतकरी पीक कर्ज भरू शकत नाही. त्यात व्याज भरणे कठीण होईल. यामुळे बँक आणि शेतकरी दोघेही अडचणीत येऊ शकतात.