जनतेज न्युज

बर्ड फ्लूच्या पाश्वभूमीवर वनविभाग अलर्ट ; यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

प्रतिनिधी , यवतमाळ : देशात बर्ड फ्लूने एन्ट्री केली आहे. राज्यात प्रादुर्भाव दिसून आला नसला तरी काळजी घेतली जात आहे. बर्ड फ्लूच्या पाश्वभूमीवर वनविभाग अलर्ट आहे, अशी माहिती यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाच पुन्हा बर्ड फ्लूचे संकट घोंघावत आहे. राज्यात मोठया प्रमाणात विदेशी पक्षी स्थलांतर करून येतात. काही पक्षी मृत आढळून आल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्यात यावी, हॅन्ड ग्लोव्हज घातल्या शिवाय हात लावू नये, असे परिपत्रक काढण्याच्या सूचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश राज्यात मृत पक्षी आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात काळजी घेतली जात आहे.