आता थेट गुजराती समाजाच्या कार्यक्रमास मनसे आमदारांची हजेरी,,,
प्रतिनिधी , आरटीओकडून मराठी नंबर प्लेट लावणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली जात असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना गुजराती भाषेत उपरोधिक ट्विट केला होता ,आता तेच मनसे आमदार राजू पाटील यांनी गुजराती समाजाच्या एका संस्थाकडून आयोजित रक्तदान शिबीर हजेरी लावली आहे. इतकेच नाही तर पुढच्या कार्यक्रमासाठी मदत देण्याचे आश्वासनही राजू पाटील यांनी यावेळी दिले आहे. डोंबिवलीत तरुण मित्र मंडळ या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते संस्थेकडून हा 100 वा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून डोंबिवलीत 26 वा रक्तदान शिबिर आज होता. या शिबीरात मोठय़ा संख्येने नागरीकांनी रक्तदान केले आहे. कोविडच्या पाश्र्वभूमीवर हे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. भाजप शिवसेनेनंतर मनसेही गुजराती मतांवर डोळा ठेवला आहे. आत्ता परप्रांतीयांचा मुद्दा घेऊन चालणा:या मनसे आमदारांच्या उपस्थितीने चर्चेला एकच उधान आले आहे.
