प्रतिनिधी , पंढरपूर : आमदार भारत भालके यांचे पार्थिव पंढरपुरात दाखल झाले आहे. आमदार भालके चेअरमन असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भालके प्रेमिंची एकच गर्दी उसळली होती. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेताना नागरिकांना अश्रू अनावर झाले महिला दही मोकळून रडू लागल्या. पंढरपूर शहरात आल्यानंतर श्री विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा मारून पार्थिव मंगळवेढा कडे रवाना झाले नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
आमदार भारत नाना भालके हे जमीनिवर पाय असलेले लोकनेते होते. तालुक्याचा , जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास त्यानीं घेतला होता . भालके चार वेळा विधानसभा निवडणुकीला उभे राहिले. तीन वेळा ते विजयी झाले पण चारही वेळा ते वेगवेगळ्या चिन्हावर लढले . मतदारासंघातील जनतेला भारत नाना भालके हेच पक्ष होते . आज महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती दिनी त्यांना श्रद्धांजली वाहावी लागली हे सर्वात मोठे दुःख आहे. नानांचे अधुरे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. नाना गेले असले तरी महाविकास आघाडी पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनते सोबत काय असल्याच्या भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या .
