जनतेज न्युज

आमदारांनी भूमिपूजन केलेल्या पूल बांधकामावर चक्क विद्युत चोरी.

प्रतिनिधी, बुलडाणा : एकीकडे शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाहीय, गावचे गावे अंधारात आहेत..मात्र दुसरीकडे आमदारांनी भूमिपूजन केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतर्गत असलेल्या पूल बांधकामाच्या ठिकाणी चक्क चार ठिकाणी वायर टाकून विद्युत चोरी होत असल्याचा प्रकार उघड झालाय.. दिवसा ढवळ्या सुरू असलेला हा संपूर्ण प्रकार केमेरात कैद झालाय. तर ही चोरी उघड चोरी मागील अडीच ते तीन महिन्यापासून सुरू असल्याचे कळतेय.मात्र केमेरा पाहताच मजुरांची धावपळ झालीय. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली – धाड रस्त्यावरील साकेगाव जवळ दोन ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंतर्गत मागील अडीच ते तीन महिन्यापासून पुलाचे बांधकाम सुरुय.ज्यावेळी या पुलाचे बांधकाम सुरू झालेय,त्यावेळी चिखली च्या आमदार श्वेता महाले यांनी या पुल बांधकामाचे मोठ्या थाटामाटात भूमिपूज केलेय..त्यानंतर कामही सुरू झालेय.मात्र बांधकाम ठेकेदाराने याठिकाणी वापरण्यात येणाऱ्या मशिन्स साठी चक्क महावितरण च्या तारांवर चार ठिकाणी वायर टाकून विद्युत चोरी सुरू केलीय.यामध्ये वेल्डींग मशीन, स्टील कटर, मोटार पम्प, फोकस, लाईट चा समावेश आहे. एव्हढ्या महिन्याचा कालावधी उलटला,पुलाचे बांधकाम ही अर्ध्यावर झालंय,मात्र महावितरण च्या अधिकाऱ्यांना या कामावरील विद्युत चोरी का दिसली नसावी ? ,हे उलगडणारे एक कोडेच आहे. एकीकडे शेतकरी वर्गाला वेळेवर विद्युत मिळत नाही,गावात लोडशडिंग केले जाते.सर्वसामान्य नागरिकानी जर चोरी केली तर त्यावर तात्काळ कारवाई होते.मात्र याठिकाणी तसे पाहायला मिळत नाहीय, उलट ठेकेदाराला विद्युत चोरी करण्यासाठी त्याकडे कानाडोळा करताना दिसतोय.याविषयी महावितरण चे अधिकाऱ्यांना विचारले असता त्यानी 11 मार्च ला विद्युत चोरी पकडल्याचे सांगतात, ठेकेदारला 18 हजाराचा दंड ही केल्याचे सांगतात, मात्र ठेकेदाराचे हातात अद्यापही दंडाची पावती दिली नाहीय.शिवाय  अजूनही त्याठिकाणी दिवसा ढवळ्या चोरी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले तर आम्ही का त्याठिकानीच थांबावे का? असे उलट उत्तर दिलेय.त्यामुळे महावितरण चे अधिकारीच विद्युत चोरी ला खतपाणी घालतात असे दिसतेय.आशा मुजोर अधिकाऱ्यावर ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करणे गरजेचे आहे.