जनतेज न्युज

आम्ही nda चे घटक आहोत आणि राहणार, रासपचे एकमेव आमदार असलेले रत्नाकर गुट्टे यांच परभणीत वक्तव्य .

प्रतिनिधी , परभणी : राष्ट्रीय समाज पक्ष nda सोडून महावीकास आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेली असतांना राष्टीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि गंगाखेडचे आमदार असलेले डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना आज परभणीत ही चर्चा चूक असल्याचं सांगितलं . आम्ही nda चे घटक आहोत आणि राहणार, असल्याचं गुट्टे यांनी सांगितलं . मी आणि जानकर साहेब गंगाखेड शुगर्स कारखान्यावर लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांना भेटलो
त्यामुळे आम्ही nda सोडणार असे मीडिया अर्थ लावत होता, मात्र यात काही तथ्य नसल्याचं गुट्टे यांनी स्पष्ट केलंय, सोबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आपल्याला नाहक त्रास देत असल्याचं ही ते म्हंटले.