जनतेज न्युज

कल्याण-डोंबिवली मध्ये रक्ताचा तुटवडा,काहीच दिवसाचा रक्तसाठा शिल्लक …..

रक्तदान करण्याचं नागरिकांना आवाहन ..

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कोविड च्या भयानक परिस्थिती मुळे राज्यात रक्ताचा तुडवडा जाणवत आहे.अवघ्या सात ते आठ दिवसाचा रक्तसाठा शिल्लक असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कल्याण डोंबिवली मध्ये देखील परिस्थिती तशीच आहे रक्तपेठ्या मध्ये रक्त साठा खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे.डोंबिवलीतील चिदानंद चॅरिट्रेबल ट्रस्टकडून नागरिकांनी रक्तदाना साठी पुढे येण्याच आवाहन केलं जात आहे .कोविड च्या काळात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाली असून दुसरीकडे रक्ताची मागणी वाढल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.
कल्याण डोंबिवली मधील नागरिकांनी स्वतः पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन पालिका प्रशासनासह ,रक्त पेढ्यांकडून केलं आहे .