प्रतिनिधी, वर्धा : आर्वी ते तळेगांव राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी दि. १४ जुन रोजी वसंतराव नाईक चौक आर्वी येथे माजी आमदार अमर भाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली आर्वी विधानसभा काँग्रेस व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. ह्या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली होती.
व्हॉईस – अमरभाऊ काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, पुढील ७ दिवसांमध्ये रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात न झाल्यास दि. २१ जुन रोजी वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांच्या निवास्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. ह्या कालावधीत सदर कामाला सुरुवात झालेली नाही. त्या अनुषंगाने आज आर्वी विधानसभा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धा येथे खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थाना समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
