प्रतिनिधी , इंदापूर : इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळील डिकसळ येथील उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दुर्मिळ असलेल्या इंडियन स्टार जातीचे कासव मासेमारी करणाऱ्या पारधी समाजाच्या दांपत्याला सापडलेय..
जगभरातुन दुर्मिळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव कासवांच्या जागतीक तस्करीत पहिला नंबर असलेल्या व जगभरातुन दुर्मिळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनीच्या ४० वर्षाच्या इतिहासात पाहिल्यादाच इंदापुर तालुक्यात भिगवण जवळील डिकसळ येथे मासेमारी करणाऱ्या पारधी समाजाच्या दांपत्याला सापडले आहे. हे कासव सामान्य कासवांपेक्षा इंडियन स्टार कासव अतिशय सुंदर,असमान्य व मनमोहक असुन, त्याच्या बाह्य कवचावर तारांप्रमाणे दिसणारे मनमोहक सोनेरी रंगाचे सप्तर्षी आकारात ठिपके आहेत. कासवांच्या प्रजातीमध्ये इंडियन स्टार जातीच्या कासवाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका वाळवंट तसेच पाकिस्तान,म्यानमार, श्रीलंका या देशात ड्राय झोन भागात तर भारतात आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल येथे हे कासव आढळुन आल्याच्या नोंदी आहेत. सापडलेले कासव ताब्यात घेऊन त्याला डिकसळ येथील वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे..
उजनीत मासेमारी करणारे पारधी समाजातील विनोद अभिलाल काळे व त्याची पत्नी शिवानी हे दोघे नेहमीप्रमाणे उजनी पाणलोट क्षेत्रात डिकसळ भागात पहाटे मासेमारीसाठी गेले होते.यावेळी उगवत्या सुर्य किरणांमध्ये त्यांना चमकणारी वस्तू त्यांना दिसली त्यामुळे मोठ्या कुतूहलाने जवळ जाताच त्यांना आत्तापर्यंत कधीच पाहण्यात नसलेले कासव दिसले.त्यांना हे कासव दुर्मिळ असल्याची जाणीव झाली.वास्तविक तस्करीचा विचार मनात आला असता तर ही पहाट त्यांना सोनेरी ठरली असती मात्र तसे न करता त्यांनी याची माहिती पिंटू शिंदे यांना व माध्यम प्रतिनिधी यांना दिली व सदरचे कासव वनविभागाच्या ताब्यात देणेबाबत प्रमाणिक विनंती केली आहे.त्यानुसार हे कासव वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
