जनतेज न्युज

हिंगोलीत विदेशी बनावटीचे पिस्टल,भरमार रायफलसह जिवंत काडतुसे जप्त

स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
प्रतिनिधी , हिंगोली : हिंगोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एक विदेशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, छर्रे व एक भरमार रायफल, चाकू असा अवैध शस्रसाठा जप्त केला आहे. सेनगाव तालुक्यातील बोडखा तांडा येथे आज सकाळी हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे. विदेशी बनावटीचे पिस्टल व भरमार रायफल मिळण्याची हिंगोलीतील हि पहिलीच घटना आहे.