जनतेज न्युज

इंधन बचतीसाठी भारत सरकारच्या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन

प्रतिनिधी , जालना : जालना संरक्षण क्षमता महोत्सव हा राष्ट्रीय कार्यक्रम16 जानेवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. भविष्यकाळात इंधन टंचाई जाणवू नये, यासाठी इंधनाचा आवश्यक वापर कसा करावा, जेणेकरून इंधन बचतही होईल, यासाठीच या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून संरक्षण क्षमता महोत्सवाच्या माध्यमातून इंधन बचतीविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती एचपीसीएल व बीपीसीएल या पेट्रोलियम कंपन्यांच्या विक्री अधिका-यांनी जालना येथे पत्रकार परिषदेत दिली.
एचपीसीएलचे जालना जिल्हा सिनियर सेल्स मँनेजर किशोर अंकुला, बीपीसीएलचे जालनासेल्स आँफिसर सतीश अहिरवाल, क्वालिटी कंट्रोल औरंगाबादचे असिस्टंट आँफिसर मनिभूषण यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.
पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धांचे धोरण आणि रणनितीचा सरकारला मदत करण्यासाठी अग्रणीय आहे, असे या अधिका-यांनी सांगितले.