प्रतिनिधी , कल्याण: डोंबिवली कोरोना रुग्णांसह कोरोनातुन बऱ्या झालेल्या रुग्णांची फुफ्फुस कमकुवत झालेली असतात प्रदूषणामुळे अशा रुग्णांसह अस्थमा दम असलेल्या रुग्णांना इजा होण्याचा धोका असल्यामुळे यंदा फटाके विरहित आणि प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करा असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आहे
मागील तीन दिवसापासून कल्याण डोंबिवली शहरातील रुग्णसंख्या दोन आकड्यावर आल्याने प्रशासनासह नागरिकांसाठी ही दिलासा दायक बाब आहे याबाबत पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ प्रतिभा पान पाटील यांनी रुग्ण संख्या आटोक्यात आलीं असली तरी थंडीचा मौसम सुरू होत असल्यामुळे गाफील राहून चालणार नाही. अद्यापि कोरोनाचा धोका टळलेला नसल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित वावरच्या नियमांचे पालन करावे, सॅनिटायजर, मास्कचा वापर करत प्रशासनाला सहकार्य करावे ज्यामुळे कमी झालेली रुग्णसंख्या आणखी कमी करणे शक्य होईल अन्यथा दुसरी लाट येण्यास वेळ लागणार नसल्याचा इशारा आहे. नागरीक आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळेच 8 महिन्या नंतर करोना आटोक्यात आणणे शक्य झाले असून ही संख्या कमी ठेवण्यासाठी नागरिकांनी असेच सहकार्य करत दिवाळीचा सण इकोफ्रेंडली साजरा करत गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे
