प्रतिनिधी ,पंढरपूर: आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीपासून पंढरपूरच्या मंदिर परिसरामध्ये संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली होती. काल जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या बरोबर बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्याने आंदोलक दिंडी मोर्चा काढण्यावर ठाम होते. आज पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त असताना देखील मोजक्या प्रतिनिधींना नामदेव पायरीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली होती. नामदेव पायरीचे दर्शन घेऊन विठ्ठलाला साकडे घातल्यानंतर हा मोर्चा छत्रपती शिवाजी चौकातून पुढे मार्गस्थ झाला. मात्र पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हा दिंडी आक्रोश मोर्चा पुण्यापर्यंत एसटी बसने सोडण्याची तयारी प्रशासनाने केलीय.
