जनतेज न्युज

तुळजापूर मंदिर परिसरात कलम 144 लागू…

सर्व आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारली
प्रतिनिधी , उस्मानाबाद:महाराष्ट्र राज्यातील मंदिर सुरु करावीत या मागणीसाठी विविध संघटना,राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री 12 पासून तुळजापूर तुळजाभवानी मंदिर परिसरातील 300 किलोमीटर परीघ परिसरात कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
काल भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुलाजापुरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते,
त्यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार मंदिर परिसरात घडू नये यासाठी प्रशासनांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
तुळजाभवानी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असल्याच चित्र सध्या पहायला मिळतं आहे.