जनतेज न्युज

इगतपुरी शहरातील जुन्या राष्ट्रीय महमार्गाची गेल्या 4 वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था …..

प्रतिनिधी , इगतपुरी शहरातील जुन्या राष्ट्रीय महमार्गाची गेल्या 4 वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे वारंवार निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा च्या नेतृत्वाखाली जनसेवा प्रतीष्ठाण, जेष्ठ नागरिक संघ, श्रमजीवी संघटना यांच्या वतीने इगतपुरी रेल्वे स्टेशन समोरील खड्यात वृक्षारोपण करण्यात आले या वेळी काही काळ ट्राफिक जाम झाली होती. या प्रसंगी इगतपुरीचे तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले. या वेळी तहसीलदारांनी लवकरच रस्त्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन दिले व आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन खोसकर यांनी या रस्त्यासाठी 1 कोटी तीस लाख मंजूर झाले असून लवकरच अजून 2 कोटी रुपये या स्त्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले