जनतेज न्युज

उत्तर प्रदेशातील हाथरस धक्कादायक घटनेविषयी.. ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी , पुणे : उत्तर प्रदेश मध्ये फिल्मसिटी काढायला निघालेले आहे त्या राज्यात जिथे महिला सुरक्षित नाही. अशा ठिकाणी साक्षीदार संरक्षण कायदा आणी संबंधित मुलींना संरक्षण देणे अशा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होणे अतिशय गरजेचे आहे माननीय राष्ट्रपती महोदय आणि राज्यपाल महोदय यांच्याकडे उत्तर प्रदेश सरकारने बेजबाबदारपणा आणि अतिशय अयोग्य वर्तन केलेले आहे या विषयाकडे लक्ष वेधणारे निवेदनाचे पत्र दिलेले आहे. त्यासोबत गुन्हेगारांना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. हाथरसच्या घटनेमधून परत महिलेल्या सुरक्षासंदर्भात उतर प्रदेशात भीषण अवस्था समोर आलेली आहे. मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश सरकार मध्ये जे लोक जबाबदार आहेत त्या सगळ्यांची चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे..