प्रतिनिधी , केंद्रात पारित झालेल्या कृषी सुधार विधेयका विरोधात शेतकरी संघटनांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात उद्याच्या सुमारे दोन डझन शेतकरी संघटना सह अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे, त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील या भारत बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे.
या बंद ला पाठिंबा देताना माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की, केंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे सरकार हे अगदी चुकीच्या पद्धतीने चालेल आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या नाकारण त्यांना दिल्लीत येण्यापासून मज्जाव करणे म्हणजे मोदी सरकार ने आगीशी भांडण घेतल आणि याचे चटके येणाऱ्या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही. तसेच या शेतकरी आंदोलनावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने आपला हट्ट सोडावा, अन्यथा संपूर्ण देशात भाजपची वात लागेल. अशी जोरदार टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली.
