जनतेज न्युज

पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर विजयी

प्रतिनिधी , पंढरपूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर विजयी झाल्यानंतर पंढरपूरात काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रकाश तात्या पाटील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
पुणे शिक्षक मतदारसंघातून पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयंत आसगावकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाशतात्या पाटील यांनी जल्लोष केला. शिक्षक मतदारसंघातील विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य पसरले आहे. पंढरपूरात टिळक स्मारक परिसरात फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपस्थितांना पेढे भरवत काँग्रेस च्या यशाचा जल्लोष केल आहे.