प्रतिनिधी , आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने लातूरच्या उदगीरमध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने उच्च व सर्वोच्य न्यायालयात वकील नियुक्त करावेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीन रास्ता रोको करण्यात आला.
