प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : धुळवडीच्या दिवशी दुपारी 3 च्या सुमारास धोबीघाट परिसरातून 41 वर्षीय कुंदनमल दुलीचंद सुनगत चालत जात होता. यावेळी दारूच्या नशेत त्याचा तोल जाऊन डोक्याला दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती त्यानुसार उल्हानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
मात्र शवविच्छेदन अहवालात पडून मृत्यू नव्हे तर कुंदनमलची मारहाणीत हत्या झाल्याचं निष्पन्न झालं त्या नुसार पोलिसांनी अधिक माहिती घेत तपास सुरू केला पोलिसांच्या तपासात रुपराज उर्फ भाई राजा पाटील आणि निशान उर्फ बाळा हिरामण साठे या दोघांनी किरकोळ भाडणातून झालेल्या वादात त्याला मारहाण करत सिमेंटच्या दगडाने त्याच्या तोंडावर मारून हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार उल्हासनगर पोलिसांनी काही तासातच रुपराज उर्फ भाई राजा पाटील या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. तर बाळा साठे हा फरार आहे. सध्या पोलिस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत
