प्रतिनिधी , उस्मानाबाद : उस्मानाबाद म्हटल की दुष्काळी जिल्हा मात्र या जिल्ह्यात सोलापुर – धुळे राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा पासुन अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या वडजी -नंदगाव येथील पन्नास एक्करावर तंत्रशुद्ध कृषी , विवीध पर्यटन साधनासह पर्यटन , आश्रमासह सामाजीक तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले प्रती पंढरपुर म्हणुन धार्मिक असा संपुर्ण २५ कोटीचा प्रकल्प साकारत आहे .
महाराष्ट्रात प्रथमच चार प्रकल्प एकत्र असलेला मोठा प्रकल्प साकारत आहे . यात तंत्रशुध्द कृषी , पर्यटनात गार्डन , स्विमींग , बोटींग , रेन डांन्स , म्युझिकल हब , कै बाळासाहेब ठाकरे व कै गोपीनाथ मुंडे यांची ११ मजली फोटो गॅलरी , मोठया पाझर तलावात सहा महापुरुष व लोकनेत्यांचे अकर्षक पुतळे तर सामाजीकमध्ये वृध्दाश्रम , माहिलाश्रम, बालकाश्रम व गोशाळा तसेच प्रती पंढरपुर म्हणुन महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर असलेले विठ्ठल रुक्मीनी मंदीर साकारत आहे . हा प्रकल्प २०२४पर्यंत पुर्ण होणार असुन याचा खर्च २५ कोटी आहे . प्रकल्पाची नोंद ग्रीनीस बुक ऑफ वल्ड मध्ये करण्याचा मानस मोराळे दांपत्यांचा आहे .
