जनतेज न्युज

एटीएम फोडून 27 लाख लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

प्रतिनिधी, कल्याण : बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून सुमारे २७ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला .अवघ्या ४८ तासात पोलिसांनी या टोळी मधील दोन आरोपींना अटक केली आहे .सरफुद्दीन खान, उमेश प्रजापती अशी अटक आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाखांची रोकड व चार गाड्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे हे चोरटे चोरी साठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करायचे ,हरियाणा मधील या टोळीचे पाच सदस्य चोरी करण्याआधी हरियानाहून मुंबई येथे विमानाने आले इंटरनेट कॉल च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते .त्यांनी अटक आरोपींना चोरीबाबत माहिती देत चोरी केल्यानंतर दोघांकडून पैसे घेवून ते पून्हा विमानाने पळून गेले .सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसाना यश आले असून उर्वरित फरार पाच जणांचा पोलिस शोध घेत आहेत .दरम्यान याच टोळीने खारघर येथील एटीएम अशाच पद्धती फोडून चोरी केल्याचं निष्पन्न झाले आहे. कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकात असलेल्या बँक ऑफ इंडियाची दोन एटीएम आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास काही चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटर ने फोडून एटीएम मधील 27 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली .यावेळी चोरट्यानी सीसीटिव्ही कॅमेरावार स्प्रे मारत चोरी केली . या घटनेमुळे पोलिस ही चक्रावले होते . कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरू केला.या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली .तपासा दरम्यान ही सात जणांची टोळी असल्याचे निष्पन्न झाले .यामधील दोन आरोपी निष्पन्न करत ते कल्याण शिळ फाटा परिसरात असल्याची माहिती मिळाली .या माहितीचा आधारे पोलिसांनी उमेश प्रजापती,सरफुद्दीन खान या दोन चोरट्यांना सापळा रचत शिळफाटा परिसरातून अटक केली .तर त्यांच्या तपासा दरम्यान त्याच्या इतर पाच साथीदारांनी नावे उघड झाली .हे पाच ही जन हरियाना राज्यातील असल्याची माहिती मिळाली .पोलिसांनी या पाच जणांचा शोध सुरू केला. पोलिसांनी अटक आरोपींकडून पोलिसांनी २ लाखांची रोकड व चार गाड्या हस्तगत केल्या आहेत तसेच त्यांनी नवी मुंबई खारघर येथील एका एटीएम मध्ये अशाच प्रकारे चोरी केल्याचे उघड झाले आहे .ही आंतरराज्य टोळी असून त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील अशा प्रकारे चोरी केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.