शिक्षण अधिकारी व आयकर विभागला तक्रार अर्ज
प्रतिनिधी , अँकर पुण्यातील शिक्षण माफिया एमआयटी कॉलेजच्या संचालक राहुल कराड व उत्तम पडवळ यांच्याविरुद्ध खंडणी व कॉपीटीशन ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी गनिमीकावा युवा संघ यांच्यावतीने करण्यात आली आहे यासंदर्भात श्रमिक पत्रकार भवन याठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते कोथरूड येथील एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशासाठी 10 ते 15 लाख रुपये डोनेशन स्वरूपात मागितली जात असून त्याची कुठलीही पावती दिली जात नाही म्हणजेच पालक व विद्यार्थ्यांचे मानसिक त्रास देऊन अडवणूक करून खंडणी पद्धतीने पैसे उकळले जात आहेत ठोस पुरावा म्हणून आम्ही स्टिंग ऑपरेशन करून हा सर्व प्रकार उघडीस आणला आहे एवढ्यावर न थांबता कोथरूड पोलिस स्टेशनला तसेच आयकर विभागाला उच्च तंत्रज्ञान शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे सदर प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करून एमआयटी कॉलेज वरती गुन्हा दाखल करून घेणार आहे तसेच जर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे
