जनतेज न्युज

औरंगाबाद नामांतर: शिवसेना प्रमुखांच्या आदेशाला फाटा,वाटा फोडता येणार नाही- अब्दुल सत्तार, महसूल राज्यमंत्री

प्रतिनिधि , औरंगाबाद नामांतर : शिवसेना प्रमुखांच्या आदेशाला फाटा,वाटा फोडता येणार नाही- अब्दुल सत्तार, महसूल राज्यमंत्रीहिंगोली
औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरेंपर्यत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही मित्रपक्षांना विश्वासात घेऊनच उचित निर्णय घेतील. परंतु शिवसेनाप्रमुखांचा आदेश हा अंतिम आहे,त्यांच्या आदेशाला कोणालाही फाटा वाटा फोडता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुर्ण करत आहेत. असा विश्वास महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली येथे व्यक्त केला.