जनतेज न्युज

औरंगाबाद शहराला सोईसुविधा पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा : प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी , औरंगाबाद : शहरामध्ये काही महिन्यांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असून त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी औरंगाबाद शहरामध्ये ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली होती.

महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यात होणार असून सर्वच राजकीय आपली बाजू भक्कम पणे मांडत आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनीही आपली बाजू मांडली त्यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की आम्हाला मतदान करा आम्ही ही औरंगाबाद शहराचा विकास करू शहरांमध्ये सात ते आठ दिवसांनंतर पाणी येते जायकवाडी धरण पूर्ण भरलेलं असताना सुद्धा सात ते आठ दिवसानंतर पाणी येते परंतु वंचित बहुजन आघाडी ची महानगरपालिका मध्ये सत्ता आली तर आम्ही औरंगाबाद शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असे प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते तसेच कोणासोबत युती करायची की नाही हे महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी ठरवले जाईल