प्रतिनिधि , औरंगाबाद : गुळ हा आरोग्यासाठी चांगला असतो. साखरेला उत्तम पर्याय म्हणुनही गुळाकडे बघीतले जाते. मात्र गुळाच्या भेलीतून सतत गुळ काढणे मोठ्या जिकरीचे काम असुन धावपळीच्या युगात ते शक्य होत नाही. पण प्रीती शिंदे यांच्या गुडवर्ल्ड या स्टार्टअप मध्ये हे काम सोपे झाले आहे. पहिल्यांदा त्यांनी गुळाचे पाच आणि दहा ग्रॅम चे क्यूब तसेच चॉकलेट पावडर इन्स्टंट चहा आणि कॉफी ही तयार केली आहे. त्याचा शंभर टक्के रसायनमुक्त असणारा हा गुळ १५ प्रकारच्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे.
प्रीती प्रभाकर शिंदे यांच्या शेतात चाळीस वर्षापासून गुराळ चालते. बालपणापासून त्यांना गुळाबाबत आकर्षण होते. बारावीला एकूण ८९% मार्क घेतल्यानंतर इंजिनीअरिंग किंवा मेडिकलमध्ये न जाता पुण्यातील फ्लोम यूनिवर्सिटी मध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि लगेच व्यवसायात उतरण्याचे ठरवले. पारंपारिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. व्यवसायातील अडचणी जाणून घेतल्या तसेच गुळाचा वापर वाढवण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास केला. चार वर्षात संशोधनावर तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून गूड वर्ल्ड गूडणेस नॅचरल या कंपनीची स्थापना केली केली असल्याची माहिती प्रीती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
